संस्कार करणे म्हणजे मुळात असलेली वस्तू/व्यक्ती अधिक चांगली होण्यासाठी केलेले प्रयत्न असे मला वाटते.
सहमत. आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे आणि आवड वाढवणे हा या प्रयत्नांचा उद्देश असावा.
संस्कृतीमध्ये फक्त धार्मिक गोष्टी उदा. श्लोक, स्तोत्रे इतकेच नाही, तर
मराठी अक्षर/अंक ओळख (परदेशात वाढणाऱ्या आणि भारतात इंग्रजी माध्यमात
शिकणाऱ्या मुलांसाठी), पुस्तके, बालगीते, कविता,
महाराष्ट्र/भारताच्या इतिहासाची आणि भूगोलाची तोंडओळख अश्या बऱ्याच गोष्टी
अंतर्भूत आहेत असे वाटते. (यापैकी बऱ्याच गोष्टी मनोगतावरही उपलब्ध आहेत.)
सहज गुगलल्यावर ईस्ट बे मराठी मंडळ संस्कार वर्ग चालवते असे समजले.
त्या पानावर नित्योपासना, निवडक मनाचे श्लोक, भीमरूपी, गणपती स्तोत्र,
अथर्वशीर्ष, रामरक्षा पीडीएफ प्रकारात उपलब्ध आहेत असे दिसते. असेच उपक्रम बऱ्याच मराठी मंडळात चालत असावेत.