क्र. १,२,३,८ विशेष आवडले.
माझ्या काही:
१. मेदूवड्याला भोक कसे पाडतात ते समजावून घेणे.
२. सोनपापडीला, सुतरफेणीला दोरे आणि मसूर ला स्पंजासारखी जाळी कशी पडते ते समजावून घेणे.
३. लग्नांच्या शीजनमध्ये एकापाठोपाठ एक नात्यातली ६-७ लग्ने/इतर समारंभ अटेंड करावे लागल्यावर सर्वांना आपले ठेवणीतले २-३ नवे आणी आवडते कपडे तेच ते वाटू लागतात, म्हणून ग्रंथालयासारखे एक कपडालय चालू करणे. (स्त्री 'अ' ने घातलेला व नंतर परत केलेला कपडा तिच्या घरापासून अनेक मैल दूर राहणाऱ्या, तिची मैत्रिण व नातेवाईक नसलेल्या स्त्री 'ब' लाच देण्यात यावा. अशा प्रकारे समारंभांना सारखे तेच तेच भारी कपडे घालण्याचा तोचतोपणा वाचेल.)
४. नवऱ्याबरोबर भारी आणि महागड्या गाडीत बसून आइस्क्रीम/शीतपेय सेवन करुन रिकामे टिन/कागदी कप बाहेर भिरकावणाऱ्या बायकांना गाडीतून उतरवून कानाखाली मारुन रस्ते झाडण्यास लावणे.