नरेंद्रकाका, उत्तम लेख आणि सुंदर अनुवाद!
आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अप्रत्यक्ष धूम्रपान (पॅसिव्ह स्मोकिंग). भारतात अजूनही स्त्रियांनी धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी आहे.परंतु धूम्रपान न करणाऱ्या स्त्रियांना जवळजवळ धूम्रपान केल्याचे सर्व दुष्परिणाम भोगायला लागलेले पाहिलेले आहेत. ज्या स्त्रियांचे जवळचे नातेवाईक उदा. नवरा अतोनात धूम्रपान करतात त्यांना आणि त्यांच्या अपत्यांनाही केवळ अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे धूम्रपानाचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. त्यामुळे स्त्री रुग्णांच्या नातेवाईकांना हे समजावून सांगण्याची अतिशय गरज पडते.
साती काळे.