असं बरेचदा होतं. निदान माझ्याबाबत असं झालं नाही आत्तापर्यंत. म्हणजे मुलीला सांगण्यात अपयश आलेलं नाही.

पण जर तसे येत असेल तर थोडे थांबून मुलांच्या कलाने घ्यावे असे वाटते. त्यांच्यावर जबरदस्ती करू नये. तसंही करण्यासारखं खूप असतं त्यामुळे एखादी गोष्ट जमतच नसेल तर दुसऱ्या गोष्टींत त्यांना रस आहे का हे पाहावे.

प्रत्येकात आपली अशी प्रतिभा असते. कदाचित एका विशिष्ट वयात एखाद्या मुलाला जास्त समज असेल तर दुसऱ्याला त्याच्यापेक्षा कमी. तेव्हा मुलांचा कल ओळखून त्यांचे छंद जोपासावेत किंवा त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास उद्युक्त करावे.