मिलिंदराव,
कविता छान छंदबद्ध असल्यामुळे वाचायला छान वाटते पण...
माणसा करते पशू ही आग पोटाची कराल
भाकरी भाजायची तर घाल ती तत्त्वं चुलीत
तत्त्वे चुलीत घालून भाकरी भाजण्याची भाषा बरी नव्हे असे वाटते.
अश्या कविता लिहून आपण मराठी साहित्याचे फार मोठे नुकसान करत आहात. विषारी कविता निर्माण करण्याची कविमनाची विकृत भूक कवीला माणुसकीपासून दूर पशुत्वाकडे घेऊन जाते असे वाटते. अश्या कवितांनी फार फार तर सरकारी पुरस्कारांची भाकरी भाजून मिळेल पण त्याहून अधिक समाजजीवनास श्रेयस्कर असे काही प्राप्त होणार नाही असे वाटते.
मागे आपल्याला म्हटल्याप्रमाणे - जीवनाच्या धकाधकीत माणसाला राग येणे स्वाभाविक आहे पण तो बिचार्या कवितेवर का काढावा?
आपला
(त्रस्त) प्रवासी