केस विंचरून बसतो सदा
उवांबाबत रहातो दक्ष 
अशाने मैत्रिणी मिळणार कशा
यातच आता आमचं लक्ष

:) खूप छान. विनोदी चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं. सारखे आरशात स्वतःला न्याहाळणारे...

केस विंचरून बसतो सदा
उवांबाबत रहातो दक्ष 
मैत्रिणी शोधायला नाही वेळ
आरशाकडेच याचे लक्ष

:)

लपवून ठेवलेली फळे मात्र
एकटाच खातो झाडाआडून

हम्म्म्म... विषाद वाटला. दुर्दैवाने खूप खूप खरे आहे हे!