प्रिय मोरू,
रामायण आणि महाभारतातील मुलभूत फरक म्हणजे रामायणामध्ये सगळेच आदर्श आहेत. - आदर्श हिरो, आदर्श हिरॉईन, अगदी व्हिलनही आदर्श. ती 'ब्लॅक-व्हाईट' कहाणी आहे. महाभारतात 'ग्रे' कॅरेक्टरस् आहेत. (मला आठवते त्याप्रमाणे हे इरावती कर्वेंचे विधान आहे.)

 जरी आपल्याला कायमच सांगितले गेले असले की पांडवांची बाजू सत्याची-न्यायाची-धर्माची आहे आणि कौरवांची असत्याची-अन्यायाची-अधर्माची; तरी जर ह्या दृष्टिकोनातून, कोणालाही चूक-बरोबर मानण्याची घाई न करता जर महाभारताकडे तर ह्या प्रकारचे बरेच प्रश्न सुटतात असा अनुभव आहे माझा.

कृष्णाकडेही देव म्हणून न पाहता जर अतिशय बुद्धिमान आणि 'आपल्याला काय साध्य करायचे आहे ते लक्षात ठेवून त्याकरता कोणत्याही मार्गाचा अवलंब करणारा' माणूस म्हणून पाहिले पाहिजे. त्याच्याबद्दलचा माझातरी आदर त्याला देव नाही तर माणूस मानल्यावर वाढलाय.