साती, प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद.
अकर्मक धूम्रपान (पॅसिव्ह स्मोकिंगला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणण्यापेक्षा अकर्मक म्हणणेच जास्त सयुक्तिक होईल.) ही भारतातील खरोखरीची गंभीर समस्या आहे. विशेषत: आपल्या भिडस्त संस्कृतीमुळे. पाश्चात्य देशांमध्ये आपल्याला त्रास होतो आहे हे सांगण्यात आपल्याकडच्याइतका संकोच कदाचित बाळगत नसावेत.
मात्र, अकर्मक धूम्रपानामुळे किती ऱ्हास होतो हे लक्षात आणून देण्यासारखे शस्त्र दुसरे नाही. आपण अवनतीकारक रोगांचा मुकाबला माहितीच्या शस्त्रानेच करायला हवा. अचुक, सर्वोत्तम, खरीखुरी माहिती उत्तमरीत्या प्रसारित करून. ते साधण्यासाठी मनोगताचा उत्तम उपयोग होत आहे. प्रशासकांचेही त्याखातर मन:पूर्वक धन्यवाद! एरव्ही माहितीचे हे शस्त्र उगारणे माझ्यासारख्याला केवळ अशक्य होते. माझी माहिती माझ्यासोबतच नष्ट झाली असती.