अभिजित... रस घेतल्याबद्दल आणि माहितीबद्दल धन्यवाद.
एकाने वाटणी केली तर निवडीचा अधिकार आधी दुसऱ्याला.
आपण सुचविता आहात ती दोघांमध्ये समान वाटणी करण्याची न्याय्य पद्धती आहे.
याच कल्पनेचा विस्तार पुढे केला जातो -
"तिघांमध्ये न्याय्य वाटणी करायची असेल... म्हणजे तिघांनाही समान वाटा मिळण्याची समान संधी कशी उपलब्ध करून द्यायची"
... तपशील विसरलो आहे... आंतरजालावर कदाचित सापडतीलही... तरीही आपण/इतरांनी विचार करावा.
तिघांतील किंवा त्याहून अधिक जणांमध्ये न्याय्य वाटणीचा मार्ग शोधून काढणे हा डोक्याला चांगला खुराक आहे.
निर्वाणीचा खेळ हा त्या अर्थाने न्याय्य वाटणीचा नाही. अधिकारांची वाटणी विषम आहे. मात्र अंतिम वाटणी मात्र "न्याय्य" वाटणीच्या जवळपास होताना दिसते.