वास्तविकतेमध्ये, कोणीच एकाच भूमिकेत, विचारांशी, तत्त्वांशी, नीतिमत्तेशी कायम टिकू शकत नाही.

एक साधे उदाहरण देतो. कोणत्याही विषयावर एक प्रश्न एका गटाला विचारा आणि मग दोन गटात विभागणी करा.

बरोबर(मान्य, पटतं, वगैरे) म्हणणारे एका गटात, तर चूक(अमान्य, विरोध, वगैरे) म्हणणारे दुसऱ्या गटात.

आता त्यांना त्यांच्या निर्णयाच्या समर्थनार्थ मुद्दे, चर्चा करायला सांगा. मात्र अट एकच की त्यांनी त्यांच्या निर्णयाविरूद्ध मते मांडता कामा नयेत.

गंमत अशी आहे की, थोड्यावेळाने प्रत्येकजण हळूच, नकळत स्वत:च्या निर्णयाविरुद्धही मते मांडायला लागतो.

महाभारतातील प्रसंग आपल्याला कदाचित हाही विचार करायला लावत असतील असे मला वाटते.