द्रोण, भीष्म व कर्ण हे महा बलाढ्य होते कबूल. पण ते सर्व मिंधे होते वा काही कारणाने आपापल्या तत्त्वांशी जोडले गेले होते. त्यांची आपापली तत्त्वे ही चूक का बरोबर हा भाग थोडा वेळ बाजूला राहू द्या. पण आपापल्या तत्त्वांसाठी त्यांनी आपापल्या आयुष्यात नीती/अनीती ला कितपत स्थान दिले होते हे ही पाहणे आवश्यक आहे. कृष्णाचा तर जन्मच मुळी  ' अभ्युत्थानम् अधर्मस्य संभवामि ..' ह्या विशिष्ट हेतूने होता. कृष्ण देखील थोडा वेळ बाजूला ठेवू. थोडा वेळ कल्पना करू की हे तिघे सद्यकाळी दाऊदच्या, बिन लादेनच्या वा पाकिस्तानच्या बाजूने उभे आहेत. इतर कोणा राजकारणी माणसाची मला नाव घ्यायलाही लाज वाटते तेंव्हा आपण श्री अब्दुल कलाम (राष्ट्रपती म्हणून योग्य का अयोग्य आहेत हा विचारही बाजूला ठेवू - माझ्या मते ते एक balanced विचारसरणीचे आणि सद्ग्रहस्थ आहेत आणि अनीतीची त्यांनाही चीड आहे) ह्यांनी काय केले असते ? (अथवा कृष्णाच्या जागी तुम्ही आम्ही काय केले असते ?)  मला विचाराल तर माझ्या मते त्यांनी देखील कृष्णाने भीष्म, द्रोण आणि कर्णाच्या बाबतीत जे काही केले तेच  केले असते.