जर तुम्ही पाश्चिमात्य देशात संशोधनाचा (विशेषतः औषधांशी संबंधीत) अनुभव घेतला असेल तर होमिओपॅथी किंवा आयुर्वेद यांचा वैज्ञानिक पाया किती डळमळीत आहे हे लगेच दिसून येतं.

ऍलोपॅथीमध्ये औषधे शोधण्याच्या प्रक्रियेतील तर्कशुद्धता

अमोल,

आयुर्वेद हे प्रचीन 'भारतीय शास्त्र' आहे. त्याचा पाया अगदीच पक्का आहे अन्यथा ते आजवर टिकले नसते. ही आपलीच अनास्था आहे की आपण यात काही भर घालण्यापेक्षा त्याला नावे ठेवणे जास्ती सोपे समजतो. आणि तेच करत बसतो.

येवढेच जर ऍलोपॅथीचा पाया भक्कम आणि तर्क शुध्द असता तर कित्येक औषधांना कालांतराने तेच लोक बंदी का आणतात?

पेनिसिलिनचा टेस्ट डोस मध्येच कित्येक रुग्णांची बोंब का होते?

आणि सध्याची स्थिती बघता, हेच परदेशी लोक आता आयुर्वेदाकडे डोळे लावून बसलेले आहेत. आणि जेव्हा ते म्हणतील की, आयुर्वेद ग्रेट आहे, मग तेव्हा आपले डोळे उघडणार नी 'अरे हे तर आमचेच प्राचीन शास्त्र" असे म्हणुन बोंब मारणार... असो

ऍलोपॅथी बऱ्याच औषधांवरती, अगदी बारीक अक्षरात 'आयुर्वेदीक' असे का लिहितात? आणि जरा नीट बघीतले तर कित्येक औषधांमध्ये जे घटक पदार्थ असतात ते आयुर्वेदीक का असतात?

केवळ छान छान प्रयोगशाळेत, परीक्षानळ्या हलवल्या म्हणजेच संशोधन होते का?

आपल्या पूर्वजांनी जे येवढे शास्त्र लिहुन ठेवलेय ते उगाच / फ़ुकाचे वाटते का?

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक शास्त्राचे काही नियम असतात ते आहेत तसे मान्य करावेत आणि पुढे जावे , समजून घ्यावेत.

ऍलोपॅथीच्या नियमाने आयुर्वेदाला तोलू नका. त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ते तसेच राहुदेत. आणि ते मान्य करावे. उगाच नावे ठेवु नयेत.

सगळे आम्हाला ऍलोपॅथीच्या सारखे गणिती नियमात सिध्द करून दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी.

क्रिकेटचे नियम लावून फ़ुटबॉल खेळून दाखवण्याची अपेक्षा कशासाठी ?

इथेच एक दुवा देत आहे, आयुर्वेदातील काही गोष्टी कळतीलही आणि अधिक माहीती हवी असल्यास आपण जरूर व्य. नि. करू शकता.

माहीतीपर लेख

 --सचिन