स्वाती,

भोंडल्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. लहानपणची आठवण झाली. आमच्याकडेही खूप छान भोंडला व्हायचा. त्यामध्ये पाटावर हत्तीचे चित्र काढून फेर धरून गाणी म्हणायचो. यामध्ये छोट्या मुली, व आम्ही शाळेतल्या मुली असायचो. माझी आई रोज वेगवेगळ्या खिरापती करायची. म्हणजे पहिल्या दिवशी १, दुसऱ्या दिवशी २ अशा करत करत ९ व्या दिवशी ९ + १ खिरापत भरपूर खायला अशी करायची. फेर धरताना २ फेर व्हायचे. एक छोट्या मुलींचा व १ मोठ्या मुलींचा. सर्व गाणी म्हणायचो. आता थोडी आठवतात. त्यातली काही काही अर्धवट आठवतात.

रोहिणी