मान्य केलंत, पण तरीही शुद्धिचिकित्सक वापरला नाहीच.

तुम्ही सुर्याच्या फेऱ्या कशा घालणार? सूर्याच्या फेऱ्या सूर्य स्वतःच घालेल की! तुम्ही शनीच्याच फेऱ्या घाला त्यासाठी तुम्हाला सूर्याभोवती फेऱ्या माराव्या लागतील.

शु. ची. वापरला तर तुमचे लेखन लिखानच राहणार. शुद्ध लिहायचे असेल तर शु. चि. वापरून लिखाण करावे लागेल.

खरे कारण वेळ नाही? म्हणून ठिकरता आले नाही? हे कारण ठीक नाही वाटत हो. इच्छा असली की वेळ मिळतोच. आणि त्यामुळे समक्ष्वच काय क्षमस्वही म्हणावं लागत नाही.

चुक झाली म्हणता? सुचना मान्य करता? अहो मग तसे वागूनही दाखवा की! म्हणजे पुन्हा चूक होणार नाही आणि सूचना करावी लागणार नाही.

आणि विंनती कशी मान्य करतात काही कल्पना नाही हो! मला केवळ विनंती मान्य करता येऊ शकते. शुध्द लेखन नावाचा काही प्रकारच अस्तित्वात नाही. मात्र शुद्धलेखन नावाचा प्रकार अस्तित्वात आहे. तो कोणी एका महाभागाने तयार केला नाही. मात्र शुद्धलेखन केले की आपले म्हणणे पूर्णार्थाने दुसऱ्यापर्यंत पोहोचते. त्याचा शालेय जिवनातच नाही तर महाविद्यालयीन, कार्यालयीन, व्यावसायिक जीवनातही उपयोग होतो. अर्थाचे अनर्थ होणे टळते. महान बनण्यापासून वंचीत रहावे लागत नाही. अशुद्धलेखनाने तुम्ही आदरापासून वंचित राहता. शुध्द्लेखनाच्या नियमांचा खुप मोठा हात आहे म्हणता? मग त्याऐवजी शुद्धलेखन करून बघा म्हणजे ते तुम्हाला महान करण्यात खूप हातभार लावेल.

विषयांतराबद्दल क्षमस्व, पण सतत मोठ्या प्रमाणात अशुद्धलेखन बघवत नाही.