१. हिंदी चित्रपटांच्या लेखक-दिग्दर्शकांना आठवडाभर आधी धारावी आणि नंतर कुठल्याशा जुनाट चाळीत राहण्यास लावणे. (जेणे करून ते गरीब भुकेल्या नायकाच्या पायात Nike shoes दाखवणार नाहीत.)
२. मुद्दा क्र. ८ फिरवून शीतपेयांना किटक नाशके जाहीर करणे. इतकंच नव्हे तर रामदेव बाबा यांचा सल्ला मानून टॉयलेट क्लिनर म्हणून त्यांचा वापर करणे.
३. मुद्दा क्र. ३ फिरवून समस्त पुणेकरांनी तलावातील पाण्यावरून चालण्याची सिद्धी प्राप्त करून घेणे.
४.क्रिकेटमधून बऱ्याबोलाने निवृत्त न होणाऱ्या चिकटू खेळाडूंसाठी 'चिकट-शिरोमणी' पुरस्कार जाहीर करणे.
५. हिंदी चित्रपटातील नायक नायिकेचे आई आणि बाप दोन्ही दाखवले जातील असा कायदा करणे.
(आई असेल तर बाप नाही, बाप असेल तर आई नाही काय हे?)