अहाहा! कित्ती सुंदर कविता!
बकती समाजवादी बो-टाय लावणारे
हिंदुत्व द्वाड वारे चड्डीत वाहणारे
काय तडफदार उत्तर हो 'बो टाय' वाल्यांना 'अर्ध्या चड्डीतल्या' लोकांकडून. अहाहा..
आला समानतेचा आता खरा जमाना
मी पाहिल्या मुलींच्या शिट्ट्या नि हातवारे
बघा ना काय जमाना आलाय. शिट्ट्या हातवारे ही खरी तर मुलांची कामे. मुली पण तेच करू लागल्या तर काय होईल या जगाचं.
अरेरे..
जे जंगलात ते ह्या सोसायटीत आहे
असतात वाघ जेथे असणार वाघमारे
काय जंगली झालेत आजकालचे लोक! वाघ काय, वाघमारे काय एकत्रच राहातात. मला वाटतं नियम करून वाघ इ. नावाच्या लोकांना शहरात आणि वाघमारे इ. नावाच्या लोकांना शहराबाहेर सोसायट्या बांधायला भाग पाडण्यात यावे. म्हणजे शहरात वाघांना सुखेनैव संचार करता येईल.(आजकाल मुंबईत खाण्यापिण्याच्या सवयींवरून सोसायटीचे सदस्यत्व मिळते ती कित्ती कित्ती सुसंस्कृत पद्धत आहे, नाही का?)
वावावा..
एकंदर कविता अप्रतिम आहे. अर्ध्या चड्डीतल्या लोकांनी प्रातःकाळी स्मरावी अशी आहे.
साती काळे.