नामदेवराव,

आपले सर्व विवेचन मुद्देसूद आणि पूर्ण पटण्यासारखे आहे.  विशेषतः भीष्म आणि द्रोणांनी स्वतःच्या मृत्यूचा मार्ग पांडवांना दाखवून देणे हा त्यांच्या कुरुकुलाच्या संरक्षणाच्या प्रतिज्ञाबंधनातून मुक्त करण्याचा एक मार्ग होता.  त्यांच्या या बंधनापासून मृत्यूशिवाय त्यांना सुटका नव्हती.  तसेच कर्णाचेहि.  कुंतीने त्याला सांगितले की तू "पहिला पांडव" आहेस आणि युधिष्ठिराकरवी त्यालाच राज्य मिळू शकेल.  त्यावेळेस त्याने दुर्योधनाच्या मित्रप्रेमाने आणि ईमानदारीने तशाप्रकारे राज्य न मिळवता मृत्यू पसंत आहे असे सांगितले होते.  तेव्हा या सर्व सेनापतींना कोणत्याहिप्रकारे युद्धात मृत्यू होणार हे माहिती होते एव्हढेच काय ते त्यांना पाहिजेच होते.

मोरोपंत,

तुम्ही विषय चालू केला.  तुमची उत्तरे तुम्हाला मिळाली का?

कलोअ,
सुभाष