ऍलोपॅथीच्या नियमाने आयुर्वेदाला तोलू नका. त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ते तसेच राहुदेत. आणि ते मान्य करावे.

नियम ऍलोपॅथीचे नाहीत ते शास्त्राचे (तर्कशास्त्राचे) आहेत. समजा तुम्हाला दोन खेळाडूंमधला चांगला कोण हे ठरवायचं असेल तर एकाने शतक ठोकलं आणि दुसऱ्याने २५ धावा काढल्या एवढी माहिती पुरेशी आहे का? पहिल्याने गल्ली मध्ये काढल्या असतील आणि दुसऱ्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात... हाच नियम फुटबॉललाही लागू होतो :-)

थोडक्यात तुम्ही क मुळे ख ( क implies ख) म्हणता तेंव्हा बाकी सगळ्या गोष्टी सारख्या असाव्या लागतात. हे शास्त्रीय दृष्टिकोनाचं खूप महत्त्वाचं तत्त्व आहे, त्याला Ceteris paribus म्हणतात. आणखी माहिती इथे...

औषधाच्या बाबतीत मूळ hypothesis अमुक औषध घेतल्याने अमुक रोग बरा होतो हे आहे. मग औषध होमिओपॅथीचं असो, ऍलोपॅथीचं असो, आयुर्वेदाचं असो, एखाद्या बाबाचा अंगारा असो किंवा कुठल्या देवाला बोललेला नवस असो. ते पडताळून बघायचा सोपा मार्ग म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी साधारण सारख्या ठेवून १०० रोग्यांना ते औषध द्या, आणखी १०० रोग्यांना असं भासवा की त्यांना ते औषध दिलं आहे पण खरंच देऊ नका (गंडवा) आणि १०० लोकांना काहीच देऊ नका.

आता किती लोकांना बरं वाटतंय बघा...

औषध घेणारे     गंडवलेले     काहीच न घेणारे    निष्कर्ष

७०                ३०              २५             औषधाचा उपयोग होतो

६८                ६५              २५             औषधाचा उपयोग होत नाही, पण उपाय केले या भावनेचा उपयोग होतो

२७                २२               २५             औषधाचा उपयोग होत नाही आणि नुसताच उपाय केले या भावनेचा पण उपयोग नाही

२०                २१               ४०           औषधाचा उपयोग तर होत नाहीच पण घेतलं आहे म्हणून निश्चिंत झाल्याने तोटा होतो

२०               ४०                ३८            औषध घातक आहे

हा तुमचं का आमचं हा प्रश्न नाही, शास्त्र एकच आहे.