अमोल,

समजा तुम्हाला दोन खेळाडूंमधला चांगला कोण हे ठरवायचं असेल तर एकाने शतक ठोकलं आणि दुसऱ्याने २५ धावा काढल्या एवढी माहिती पुरेशी आहे का? पहिल्याने गल्ली मध्ये काढल्या असतील आणि दुसऱ्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात... हाच नियम फुटबॉललाही लागू होतो :-)

दोघेही चांगलेच खेळले. कारण, त्यांची खेळण्याची जागा सगळे काही ठरवून जाते. म्हणजे दोघांच्या स्थितीत फ़रक आलाच. गल्लीतील खेळात जसे त्याच्या १०० धावांचे महत्त्व त्याच्या संघाला आहेच, तसेच आंतरराष्ट्रीय खेळतील दुसऱ्याच्या २५ लाही तेवढेच.  याचा अर्थ असा होत नाही की गल्लीतील खेळाडु कमी दर्जाचा किंवा आंतराष्ट्रीय स्पर्धेत खेळला म्हणुन तो अधिक चांगला.

थोडक्यात तुम्ही क मुळे ख ( क implies ख) म्हणता तेंव्हा बाकी सगळ्या गोष्टी सारख्या असाव्या लागतात. हे शास्त्रीय दृष्टिकोनाचं खूप महत्त्वाचं तत्त्व आहे, त्याला Ceteris paribus म्हणतात.

मूळ फ़रक हा की, आयुर्वेदात प्रत्येक व्यक्तिची प्रकृती ही भिन्न आहे असेच मानले जाते. केवळ २ हात २ पाय आणि इतर अवयव सारखे दिसत असले तरी मूळ 'प्रकृती' भिन्नच असते. त्यामुळे आपण म्हणता ते 'बाकी सगळ्या गोष्टी सारख्या' याला अर्थच उरत नाही. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असलेने, त्याला देण्यात येणारे औषधाचे प्रमाण आणि घटक द्रव्ये बदलत असतात.

इथे गणिता सारखे नाही १ + १ = २ हे सगळ्यांना लागू होत नाही.

जे औषध मला बरे करू शकते तेच (त्याच प्रमाणात) तुम्हाला बरे करेल असे नसते. त्यामूळेच इथे आवश्यकतेनुसार बदल हा करावाच लागतो.

हेच आयुर्वेदाचे तत्त्व आहे.  (तुमच्या वरील उदा. मध्येही याचा संबंध येतोच)

होमिओपॅथी किंवा आयुर्वेद यातली कुठली औषधं चांगली आणि कुठली नाही हे ठरवण्यासाठी क्लिनिकल ट्रायल्स् करायची गरज आहे. जोपर्यंत कोणी त्या करत नाही तोपर्यंत ह्या "शास्त्रां"मध्ये किती तथ्य आहे हे आपण सांगू शकत नाही.

आता याविषयी, आयुर्वेदाच्या अनेक ग्रंथांमध्ये अशा प्रकारची अगदी बारीकसारीक माहीती व्यवस्थित दिलेली आहेच. अगदी स्थळ, काळ, आजुबाजुचे वातावरण या सर्वांची अगदी व्यवस्थित माहीती दिलेली आहे. पंचकर्मातील कोणती कर्मं कोणत्यावेळी कशाप्रकारे करावीत, औषधातील घटक पदार्थांचे प्रमाण किती असावे हे सगळे अगदीच व्यवस्थित नमुद केले आहे. इतर अनेक औषधांचेबाबतीतही पूर्ण सविस्तर माहीती आहेच. 

फ़क्त अडचण आहे ती ही की हे सगळे ज्ञान संस्कृत भाषेत आहे जे बहुतांशी सामान्या जनांना समजत नाही किंवा आपण ते जाणुन घ्यायची तसदी घेत नाही.

राहीला प्रश्न या शास्त्रांमधील तथ्याचा, तर आपणच म्हटल्या प्रमाणे, या विषयातील आपला अभ्यास अथवा अनुभव जर नसेल तर ते आपण कधीच ठरवू शकणार नाही.

आपण दिलेली आकडेमोड काही नीट समजली नाही. :( मला तरी वरील विषयाशी सुसंगत अशी वाटली नाही... असो.

--सचिन