मला ही कविता  राधिका ताराप गा, गा | राधिका ताराप गा, गा ह्या वृत्तात लिहिण्याचा प्रयत्न झाला आहे असे वाटले होते असो.
अष्टाक्षरी आहे हे कळले. असो.

अष्टाक्षरीत एका ओळीत ८ अक्षरे हवीत. पण कविता अष्टाक्षरीच्या लयीत म्हणताही यायला हवी.

असे काही लहान बदल करून बघा आणि मग लयीत वाचा-

चांदण्याचा सोस नाही
तारकांची आस नाही
सरावी ही अमावस्या
हा हट्ट ना ध्यास नाही।

केवड्याची मोगऱ्याची
गंधगाथा दूर गेली
उरातल्या भावनांची
रोज झाली पायमल्ली।

अभ्र दाटले  तरीही
तलखी देतो उन्हाळा
रुक्ष वैराण माळांचा
फक्त दिसला उमाळा।

करपली दाट राने
करपल्या मुग्ध वेली
शुष्क पाने गाळलेली
वादळाने स्वैर नेली।

थेंब साधा दवाचाही
नाही दिठीला लाभला
अश्रू उषेचा एकही
नाही नभाने गाळला

अशी गेली सात वर्षे
त्यांचा काही माग नाही
आता चंद्रावर तसा
दिसेलसा डाग नाही।

चांदण्याचा सोस नाही
तारकांची आस नाही
सरावी ही अमावस्या
हट्ट नाही, ध्यास नाही।

असो. थोडक्यात लिहिताना शब्दही लयीत म्हणून बघावे.

 शुभेच्छा.