भोंडल्याला खरंच मजा यायची. त्यासाठी किती तयारी ! पाट, हत्ती रांगोळी,आणि सगळ्यात महत्त्वाचे खिरापत. आपली खिरापत कोणाला ओळखता आली नाही की एकदम आपण कोणीतरी महान असल्यासारखे वाटायचे. प्रत्यक्षात खिरापत करण्यात स्वतःचा काडीचाही हात नसायचा.
लहान असताना कायम कुमारिका म्हणून जेवायला बोलावले जायचे. परकर-पोलकं घालून जेवायला जायचे. मजा यायची.
माझ्याकडून आणखी काही गाणी
८. आणा माझ्या माहेरचा वैद्य याची सुरुवात बहुतेक एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला अशी आहे.
१२. कोथिंबीरी बाई गं आता कधी येशील गं ?
१३. अरडी गं बाई परडी, परडी एव्हढे काय गं, परडी एव्हढे मूळ गं, दारी मूल कोण गं ?
सुरुवातीला दागिने आणलेले असायचे. मग जसे मिक्सर, फीज, वॉशिंग मशीन घरोघरी यायला लागले तसे दागिन्यांना कोणी किंमत देईनासे झाले. शेवटी मात्र नवऱ्याकडून मंगळसूत्र कायम राहिले. सध्या तेही बदलले असल्यास कल्पना नाही.
१४. नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंकाळ्यातलं लोणी खाल्लं कोणी ....
१५. शिवाजी आमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
विहिरीमधे सात कमळे
एक एक कमळ तोडिलं
भवानी मातेला अर्पण केलं
भवानी माता प्रसन्न झाली
शिवाजी राजाला तलवार दिली
तलवाऽऽरंऽऽ घेऊनी आला
हिंदूंचाऽऽ राजा तो झाला
१६. कृष्णा घालीतो लोळण, यशोदा आली ती धाऊन
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं