आई आणि मुलीची एकमेकींना पत्रे हा नवीन साहित्यप्रकार रूढ झाला. लोकहो, टाका पाट्या..
हाहाहा. हा वेगळा साहित्यप्रकार आहे. हे आगाऊ मामाचे आगाऊ भाचीला आगाऊ पत्र आहे. ह्या नंतर चिन्मयीला पत्र पाठवण्याचा मामाचा इरादा नाही. ती आणि जान्हवी त्याच्यावर चिडलेल्या आहेत बहुधा.
तेजिंदरचे खाणेपिणे, आगामी पंचतारांकित वैधव्य, जी.एं चा अनावश्यक उल्लेख हे मामाच्या विशेषणाला शोभणारे अतिआगाऊच वाटले. सुर्व्यांच्या कवितेचाही संदर्भ गूढ्च.
अहो जीएंचा उल्लेख करताना मामाने चिन्मयींच्या पत्रातील वपुंच्या उल्लेखांवरून प्रेरणा घेतली. पण त्याने कुठेही जीएंना नावे ठेवलेली नाहीत. असो. तेजिंदर पंजाबी आहे, असा आमचा समज. त्यामुळे खाण्या-पिण्याचा शौक असणार. आईला बोरिंग म्हणणारी चिन्मयी जशी आगाऊ तसाच हा मामा आगाऊ. म्हणजे इतरांच्या मते. त्यांच्या सोसायटीत ह्या 'संबंधांतला मोकळेपणा' म्हणत असावेत. मामा आणि भाची, दोघेही 'फ्रेंड्स' नावाची इंग्रजी मालिका बघतात असे दिसते एकंदर.
तेव्हा एक कर ह्या सुर्व्यांच्या कवितेचा संदर्भ आहे. दुवाही दिला आहे. भाचीला दुसऱ्या लग्नाचे सुंदर, उदात्त समर्थन (रॅशनलायज़ेशन) करता यावे म्हणून दिला आहे.
अवांतर: 'भीती' हा शब्द माझ्या कल्पनेनुसार फक्त असाच लिहिला जातो. 'भिती' हे चूक आहे.
माझा प्रेफ़रन्स 'भीती'ला असला तरी 'भिती' चूक नाही.