बाहेर मस्त पाउस पडत असतो. शुक्रवार ची/शनिवारची संध्याकाळ असते. 'उद्या सुट्टी आहे' हे सुख आपल्याभोवती तरंगत असते. (त्यामानाने रविवार दु:खी असतो कारण '२ दिवसाची आरामाची सवय मोडून' उद्या कचेरीत जायचे असते.)त्यावेळी संध्याकाळी(फक्त स्नॅक्स हं! उद्या सुट्टीच आहे, जेवणाचे बघू सावकाश..) भजी खात खात गप्पा मारणे किंवा वेड्या खोक्यावर आपला आवडता सिनेमा (जॅकी चॅन/अमोल पालेकर/हृशिकेश मुखर्जींचा कोणताही..) बघत बसणे. अहाहा..
प्राजू, आता नाही येऊ शकत, पण भजी बनत राहतील आणि पाऊस पण येत राहिल..भेटूच पुन्हा.