त्यांच्या पत्रातले दोन परिच्छेद वाढवते आहे.
जान्हवीला सांगावे मराठीत 'भिती' आणि 'भीती' दोन्ही योग्य त्यातून तुझी आई हल्ली शुद्धलेखनाची पुस्तकं घेऊन बसते हो, वेळ बरा जातो तिचा, तेंव्हा पुस्तकात पाहूनच उचलला असणार तिने तो शब्द. आणि ती जान्हवी कधीपासून दुसऱ्यांच्या चुका काढायला लागली? ' व्यवस्थीत हा शब्द तिनेच शिकवला वाटतं तुला. आणि मागे तू आणि ती जान्हवी त्या भंकस्मोच्चीला हसायचात पण भारावूनबिरावून मध्ये एक मोकळी जागा सोडतात हे विसरलीस वाटतं? तरी तू शाळेत असल्यापासून सांगायचो की लिहिलेला पेपर पुन्हा वाच मगच सुपूर्त कर. पण तुम्ही आज कालची वाह्यात पोरं. तिच्या नादी जरा कमीच लाग, गेल्या वेळेस तिची ती आक्का गेली तर काय रडारड केली होती तिने लोकांसमोर; पण त्याच संध्याकाळी त्या वेंकट आणि तुझ्याच तेजिंदरला खेटून बसून बिअर ढोसताना पाहिलं होत तिला. काय ते चाळे चालले होते तिघांचे की लिहीत नाही हो तुला इथे. कशाला पाहता ते 'दॅट ७०ज् शो' सारखे कार्यक्रम?
जान्हवीला जीएंनी वेड लावले आहे असे तुझी आई सांगत होती. जान्हवीला सांगावे जीए वाचून उगाच भावविभोर होत जाऊ नकोस. व्यवहारी बन. सकाळात प्रूफ़रीडरची नोकरी आहे आणि दुसरी तिची लक्षणे फार बरी नसली तरी टंकलेखन बरं जमतं म्हणे तिला. अग! इथे तिथे पाट्या टाकताना पाहिलं आहे की गं तिला.
टीकू मामाकी जय!