नाम्या,

तुम्ही अत्यंत सुंदर सटीक विवेचन केले आहे. विवेचन वाचून मनात आलेले काही मुद्दे -

१. कर्णाने खोटे बोलून अस्त्रविद्या ग्रहण : चूक :: पांडवांचा अख्खा अज्ञातवास, युधिष्ठिराचे अर्धसत्य, कृष्णाचे राजकीय डावपेच : ??
२. द्वेषाने भारलेली का असेना पण जनकल्याणार्थ उपयोगी अशी प्रतिज्ञा केली आणि मरेपर्यंत निभावलीही कर्णाने.. कुठल्याही कारणाने का असेना असे कुठले पाऊल जनकल्याणार्थ पांडवांपैकी कोणी उचलले असल्यास माझ्या ऐकण्यात नाही. 
३. इतके आयुष्य गप्प बसलेल्या कुंतीला युद्धाच्यावेळेसच का प्रथमपुत्रप्रेमाचा इतका पुळका आला?
४. द्रोण आणि भीष्म यांना साध्यासरळ भाषेत 'फुटीर' म्हणायचे का?
५. कृष्णाने पती म्हणून केवळ त्या स्त्रियांना त्याचे नाव दिल्याने त्याची जबाबदारी खरोखर पूर्ण होते का?

कृष्ण एक अत्यंत हुशार वकील होता, ज्याने त्याच्या अशीलाचा शेवटपर्यंत फायदा पाहिला.

कर्ण हा चुकला आयुष्यात पण आयुष्यातच केल्या चुकांचं प्रायश्चित्त त्याने भोगून घेतल्याने शेवटी स्वर्गात जाताना तो अडखळवला गेला नाही ! कर्णाबद्दल नेहमी एक मनात येतं की पंडू आणि माद्री वारल्यानंतर पांडवांना घेऊन हस्तिनापुराला परत जाताना कुंतीने मध्ये कर्णाचा शोध घेऊन त्यालाही सोबत नेले असते तर...

चु.भू.द्या.घ्या.