सिमेंटला आता उगाच वेगळा शब्द शोधण्याचा अट्टाहास करू नये.तो शब्द मराठीत चांगला रुळला आहे.
आणि अट्टाहासाने शब्द शोधलाच तर वापरणार आहे का कोणी? म्हणजे किमान बांधकाम तंत्रज्ञ, कामगार वापरणार आहेत का? उगाच मराठीत एक बोजड शब्द का आणायचा ज्याचा वापर केवळ "शासकीय परिपत्रकात स्थापत्यसाहित्याच्या निविदा मागवण्यासाठी'' केला जाईल?
शिमीट, चिमीट हे शब्द पूर्वीच रूढ झाले आहेत.
मी नवीन शब्द तयार करण्याच्या विरूद्ध नाही पण भाषेचे वर्धन होण्याच्या दृष्टीने इतर भाषांतील शब्दांची भर पडणेही गरजेचे आहे.
ता. क. अरबी , फारसी आणि हिंदुस्तानी अशा भाषांतून आलेले शब्द काढून टाकले तर आजच्या मराठीत किती तरी कमी शब्द उरतील.