धन्यवाद मोरू आणि इतरांना.
महाभारताचा शेवटचा काळ ही कलीयुगाची सुरवात असे मानतात. मी सुरवातीला म्हणल्याप्रमाणे "हा जय नावाचा इतिहास आहे", अर्थात जिंकलेल्यांनी लिहीलेला आणि त्यांच्या प्रत्येक क्रियेला तर्क जोडून.
एक खुलासा: १०० कौरवांना फक्त एका पांडवाने मारले आहे, ते म्हणजे भिमाने. त्यातला दुर्योधनाच्या वधात मांडी खालचा प्रहार (जी भिमाची वस्त्रहरणाच्या वेळची प्रतिज्ञा होती म्हणून क्षम्य..) सोडल्यास, सर्वांना त्याने नियमानेच मारले आहे.
कृष्ण हा वकील होता हे बरोबर आहे, पण त्याने वकीलीच काहीच फ़ी घेतली नाही. तसेच त्याकाळाला विरूद्ध जाऊन, त्याने स्वतःचे नाव उपेक्षित बायकांना देणे आणि तसा मान मिळवून देणे ही पण काही साधी गोष्ट नव्हती.