सध्या हिंदी सिनेमात ज्या हलक्या फुलक्या चित्रपटांचं वारं वाहू लागलं आहे त्याकडे पहाता आपले सामान्य चेहर्‍याचे आणि हिरोगिरी न करणारे पण खरेखुरे वाटणारे चेहरे नक्कीच यशस्वी ठरतील. (ब्लफ मास्टर मधला डिट्‍टु, लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातली अर्धी आजोबाकंपनी आठवा हिट आहेत कि नाही). नाना तर एव्हरटाइम ऍक्टर आहे पण रितेश आणि श्रेयस, अमोल पालेकरांसारखे दीर्घकाळ लक्षात रहाणारे आणि कुटुंबियांसमवेत कधीही पहावेत असे चित्रपट देणारे अभिनेते ठरतील. त्यांना शुभेच्छा.