नमस्कार,
मराठीतील एक दिग्गज म्हणजे दिलीप प्रभावळकर आता हिंदीत खुप दिसताहेत. आणि हो आता मराठी नटांना भूमीकासुध्दा महत्त्वाच्या मिळताहेत. हे तेवढं बरं.
पण एक शंका आहे, खरंच कुणी केवळ मराठी आहे म्हणून आपल्या अभिनेत्यांना घरगड्यांचे पात्र देत असेल? कोट्यावधी च्या प्रमाणात लावलेला पैसा नफ़्यासाहीत परत द्याल असा मसाला तुमच्यात आहे असं जर का निर्मात्यांना वाटलं ना, तर ते घरी चकरा मारतील. अगदी पेठेत राहत असला तरी झकत घरी येतील. नफ़्या पुढे त्या मायानगरीत सब झुट आहे असं मला वाटतं. त्यामुळे मराठी ऍक्टर असा काहीही गट मला वाटत नाही. तुमच्यात सेलेबल मटेरीयल असेल तर कुणीच थांबवू शकत नाही. अर्थात जर तुमच्या जवळ असं काही नसेल आणि तरीही तुम्हाला तेथे टिकायचं असेल तर तुमच्या मामा किंवा काकाला सांगा फ़िक्चर काढायला.
नीलकांत