एकच धडकी, एकच अंतिम बोल त्याने पुन्हा ऐकला. शून्य मनाच्या घुमटात पारवा घुमला. जीवाला दुखवून मायेचा हिरवा रावा दूर उडाला. खाली पाण्याचा डोह आहे. त्यावर तलम नाजूक वस्त्र पसरल्याप्रमाणे गोड काळिमा आहे.इथवर चित्र कसे छान आहे. खडी काढलेल्या नायलॉनप्रमाणे. पण नंतर अंग थरारते.फुले तुडवीत तुडवीत भान न रहाता खूप पुढे जावे, व वळताच विशाल शिखरांच्या पार्श्वभूमीवर शुभ्र दाढीचा भव्य योगी तपश्चर्येत मग्न असलेला दिसावा, त्याप्रमाणे मन दबते, पावले थांबतात, व मनावर झर्रदिशी काटा चमकून जातो.त्या डोहात, पालथ्या घातलेल्या आभाळाखाली पाय सोडून औदुंबर बसला आहे! भव्य, गंभीर, विचारमग्न! आजूबाजूला पाखरे, कीटक उडतात,-मरतात. ऐलपैल तटावरील हिरवळी खाऊन पोसलेली गुरे, मेंढ्या चार घरांच्या गावात कापली जातात. पण हे सारे स्वीकारून, पचवून औदुंबर मग्न बसला आहे.महाबोधी वृक्षालाच बुद्धाचे ज्ञान झाल्याप्रमाणे तो शांत आहे...
बापरे!! काय जबरदस्त !!
कोणत्याही सत्त्याग्रहाचे फुकटे वैरण.
हे आणि असे सुधा फारच जोरात.
या कठेबद्दल धन्यवाद. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.
--लिखाळ.