दत्तूच्या मनावर एका आकर्षक अलिप्ततेची छाया पडली.
हातावर पातळाचा पोत पहात असतानाच पायाच्या अंगठ्याने पिंढरी खाजवणारी कापडदुकानातील तरुणी, 
तो हे सारे पहातो आहे. तो हे पाहात आहे हे कुणी तरी पाहात आहे, आणि तो हे पाहात आहे हे कुणी पाहाते, हे पाहाणारे कुणी...
पण ही भावना फार वेळ टिकलीच नाही. वाऱ्याने दूर गेलेले ओलसर वस्त्र पुन्हा येऊन अंगाला चिकटल्याप्रमाणे सारे जीवन त्याला चिकटले.
जबरा...
सर्वच मस्त.