एका दमात सगळे प्रतिसाद वाचले,बरच विचारांचे तरंग उमटले.

मलाही पूर्विपासून हा प्रश्न खटकत असे. मुख्य भूमिका अपवादानेच मराठी व्यक्तीरेखा असते.(स्वदेश-मोहन भार्गव)कित्येक धारावाहिकेतहि मराठी पात्रे आईशिवाय कुठला मराठी शब्द वापरत नाहीत(उदा.कुसुम) पण मला वाटत यासाठी अर्थसहाय्य ह महत्त्वाचा मुद्दा आहे.एक म्हण आहे,जुनं पांघरून सोनं विकायला बसलो,कुणी बघेचना. सोनं पांघरून जुनं विकायला बसलो,ग़र्दी हटेचना.त्यामुळं हे ही एक कारण असु शकतं.प्रेक्षकवर्ग तर जवाबदार आहेतच.स्वतःला कॉलेजमध्ये 'घाटी' म्हणवून घेणारे किती युवक मराठी चित्रपट बघायला उत्सुक असतात?