हिंदी चित्रपट किंवा मालिकांच्याशी संबंधित असणाऱ्यांना कोकणस्थ आणि मराठा आणि तत्सम सर्वच जातिभेद कळायची पात्रता नसते. ते काहीही करतात. म्हणूनच तर बाबूराव आपटे हेराफेरीमधे जे बोलतो ते संयुक्तिक वाटत नाही. शुद्धाशुद्धचा भाग नाही पण आपल्याकडे भाषेचा लहेजा प्रत्येक प्रदेशाबरोबरच जातीप्रमाणेही बदलतो म्हणून...
तसेच पोलिसांच्यात शिंदे, जाधव, सावंत (थोडक्यात मराठा व बहुजनसमाज) ही नावे जास्त दिसून येतात. कारण काहीही असो पण सर्व्हे घेतलात तर ही सत्य परिस्थिती आहे हे दिसून येईल. आणि या हिंदीवाल्यांचा या ना त्या कारणाने पोलिसांशी संपर्क येतोच येतो त्यामुळे त्यांना पोलिस कुठल्या आडनावाचा असायला हवा (खऱ्यासारखं वाटावं म्हणून) हे कळतं पण एरवीचा सामान्य मराठी माणूस हा आपल्या कळपातच रहाणारा आहे त्यामुळे मराठी कुटुंब कसं असतं, त्यांची जीवनपद्धती काय असते हे या दगड भैयांना कुठे कळतंय. मग चिकटवतात कुठलंही आडनाव कुठेही. मराठी म्हणजे कामवाली, खालच्या दर्जाचे, चाळकरी इत्यादीच दिसतं त्यांना. फारफार तर बँकेतला कारकून म्हणजे डोक्यावरून पाणी. आणि ते त्यांच्यासाठी सोयीचं असतं. तरूणांचं माइंड कंडीशनिंगही होतं आणि मराठी माणूस निरूपद्रवी आहे तो काही म्हणणार नाही हे माहित असतं. शूटींग्जच्या वेळेस आपापसात मराठी बोललं तर लगेच कमी समजतात हे लोक तुम्हाला. मग मी तर मुद्दामून खुन्नसवर मराठी बोलते माझ्या ड्रेसमेन शी.
असो.. हा जातीयतेचा नाही करणाऱ्यांच्या मर्यादीत बुद्धीचा भाग आहे.