प्राजक्ती,

कारल्याची पानगी छानच आहे. मला कारले खूपच आवडते. त्यातुनही भरली कारली तर खूपच. नुसती खाविशी वाटते. भरली कारली मी मनोगतवर दिली आहेत. मला कारल्याची कडू चव खूपच आवडते.

तसेच कारल्याचे लोणचे, भजी व रस्सा भाजी पण मस्त लागते. विशेष करून कारल्याच्या कोणत्याही भाजीबरोबर तांदुळाची भाकरी अप्रतिम लागते.

अशाच अजून तुला माहित असलेल्या पाककृती दे.

रोहिणी