रमादानच्या महिन्यात बरीच दुकाने दिवसभर बंद असतात. त्याकाळात इतर धर्मीयांनीही रोज़े पाळणाऱ्या मुसलमानांसमोर काही खाऊ नये असे संकेत आहेत. त्यामुळे ऑफिसमधे आमच्या खाण्यापीण्याचे खूप हाल व्हायचे. बरेचदा खोलीचे दार बंद करूनच खायला लागायचं.
ऑफिसच्या जवळच एक बेकरी होती. ती एका भारतीयाची होती आणि तो आमच्या सर्वांच्या ओळखीचा होता. तो बरेचदा दुपारी चिकन पॅटीस, पफ इ. बनवून आमच्यासाठी हळूच पाठवून द्यायचा.
संध्याकाळी आम्हीही छोले-भटुरे, कबाब (कबूब म्हणतात का तिथे, हल्ली विसरले आहे) इ. खायला जायचो.
असो. आजच एक बातमी वाचली की बरेचदा दिवसभर उपास करून संध्याकाळी तेलकट पदार्थ खाल्ल्याने शरीराचे मेटॅबोलिझम बिघडून मेदवृद्धी व पोटाचे इतर विकार संभावण्याची शक्यता वाढते. (ऐकिव ज्ञान, कृपया किस काढू नये.)