आमच्या शाळेच्या आमच्यावेळच्या मुख्याध्यापिका आणि अजून काही शिक्षिका/शिक्षक या बाबतीत वेगळे होते. तरी एक शिक्षिका खूप चांगल्या होत्या पण कडक होत्या.
मला आठवतयं की आमच्यापुढे दोन वर्षे असलेल्या (किंवा तत्सम) वर्गाला त्या सलग दोन-तीन वर्षे वर्ग-शिक्षिका म्हणून होत्या. त्यांनी खूप त्या वर्गाला शिस्त लावली. इतकी की मधली सुट्टी अथव शा. शि. च्या तासाला बाहेर जाताना, शाळेतून बाहेर जाताना हा वर्ग ओळीने जायचा, शांतपणे जायचा कधीच गडबड नाही. कर्मधर्मसंयोगाने, आमच्या मुख्याध्यापिकेच्या हि गोष्ट नजरेत आली आणि त्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी या शिक्षिकेसमोर सर्ववर्गाला "समज" दिली की, हे असले वागणे तुमच्या वयाला शोभा देत नाही. तुमचा आवाज, गडबड मला ऐकायला येयला हवी आहे. बेशिस्त असता कामा नये पण शिस्तिचा अतिरेकही नको... नंतर त्या वर्गातील मुले - हुशार होती आणि तशीच राहीली पण (मुले म्हणून नैसर्गिक") "आवाजी" कशी वाढली ते सांगायला नको!