अर्धसत्य चित्रपटातील ओम पुरीची व्यक्तिरेखा मराठी होती. इन्स्पेक्टर अनंत वेलणकर, ज्योत्स्ना गोखले (स्मीता पाटील) वगैरे मध्यवर्ती भूमिका मराठी होत्या आणि बऱ्यापैकी वास्तववादी होत्या. अर्थात चित्रपट हिंदीतच आहे, कुठल्याही पात्राने मराठी बोलायचा प्रयत्न केला नाही पण मराठीपण त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणात आहे (रेडिओवरील मराठी गाणे वगैरे). कलात्मकतेकडे झुकणारा आणि गोविंद निहलानींचा चित्रपट असल्याने हे अपेक्षीत असावे. अर्धसत्य चे नाव वर कुठे दिसले नाही म्हणून मुद्दाम नमूद करावेसे वाटले.
- प्रभावित