असाच प्रसंग माझ्या बरोबर घड्ला पण अगदी उलट, बारावीला टर्म परीक्षेचे रसायन व जीव शास्त्राचे पेपर घेऊन आमचे बालराजन सर जे विज्ञान शाखेचे प्रमुख पण होते वर्गात आले. सर आयआयटियन होते, फ़ार छान शिकवायचे पण अगदी कडक मुद्रा त्यामुळे त्यांचे चेहऱ्या वरचे भाव नाही समजायचे.
त्यांनी आल्या आल्या माझाच रोल नंबर घेतला, मी गप्प बसलो, त्यांनी मग दोन्ही पेपरचे मार्क सांगितले तेव्हा कळाले की मला दोन्हीं मध्ये पैकीचे पैकी मिळाले होते पण मला ते काही प्रश्न विचारतील ह्या भितीने मी गप्पच बसून राहीलो पण ते गेल्या नंतर जेव्हा मी मित्रांना सांगितले तेव्हा त्यांनी मल बरेच दिवस छळले.