कुठलेही अनिष्ट व्यसन स्वतःला लावून न घेण्याचेही व्यसन एखाद्याला असू शकते, असे वाटते. ते इष्ट व्यसन ह्या वर्गवारीत मोडेल परंतु शेवटी व्यसनच.

व्यसन ही जगण्यासाठी गरज नसलेली अशी क्रिया आहे जिच्या अभावाने अस्वस्थ वाटते आणि ती क्रिया घडली की स्वस्थ वाटते.

दिवसातून ३-४ वेळा खाणे/जेवणे हेही व्यसनच म्हणावे लागेल. कारण जगण्यासाठी आणि स्वास्थासाठी दिवसातले एक वेळचे जेवण पुरेसे असते. अती पाणी पिणे हेही व्यसन असू शकते. माझ्या माहितीत एका व्यक्तीस टूथपेस्टने दात घासण्याचे व्यसन होते. दिवसातून १०-१२ वेळा ती व्यक्ती दात घासायची. शेवटी एका डेंटिस्टच्या मदतीने/सल्ल्याने ही सवय मोडून आता ती दोनावर आणली आहे. माझ्या भाचीला ती लहान असताना (न पेटवलेल्या) उदबत्तीचा सुवास घेत राहण्याची सवय होती. हेही व्यसनच. रात्री झोपताना उदबत्तीचा मनसोक्त सुवास घेऊन ती उशाशीच ठेवून झोपायचे आणि सकाळी उठल्या बरोबर (दात घासायच्याही आधी) उदबत्तीचा सुवास घेण्यास प्रारंभ व्हायचा. आता ती महाविद्यालयात शिकते आहे आणि ही सवय सुटली आहे. एखाद्याला पुस्तक वाचण्याचे व्यसन असते तर एखाद्याला 'प्रामाणिकपणाचे' व्यसन असू शकते. असो. विषय गहन आहे. सध्या एवढेच पुरे.