नमस्कार,
हे बघा मी आधीच सांगितल्याप्रमाणे हा शो बिझनेस आहे. जो पैशांचा जास्त परतावा देईल असाच नट निवडला जातो. फक्त नटच काय हो तर कथा , दिग्दर्शक,आणि गीतकार सुद्धा असेच घेतल्या जातात जे पैशाचा कमाल परतावा मिळवून देतील.
बहुतांश हिंदी सिनेसृष्टी अशीच आहे. मात्र याला काही अपवाद आहे जसे राम गोपाल वर्मा आणि मंडळी. त्यांच्या सिनेमात अतिशय सामान्य ठेवणीचे मात्र जबरी अभिनय क्षमता असलेल्या लोकांचा भरणा असतो( हिरॉईनचा सन्माननीय अपवाद दरवेळेला वगळा) पण तरीही वेगवेगळ्या लोकांना आणि वेगवेगळ्या विषयांना संधी देण्याचं काम वर्मांनी केलेलं आहे. नव्या चेहऱ्यांना वाव देण्यात भट गटांचा सुद्धा हात खंडा आहे, मात्र त्यांना किमान परतावा मिळेल असेच विषय हवे असतात.
आता जरा हिंदी आणि मराठी सिनेमाच्या स्वरूपावर येऊ. आपल्या तत्काळ लक्षात येईल की मराठी सिनेमा एकतर रडूबाई असलेला चालतो किंवा मग खरंच तरल भावनिकतेला स्पर्श करणारा असलेला चालतो. मराठी सिनेमाची ठेवण ही हिंदीच्यापेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळे मराठी सिनेमाच्या नटाची सुद्धा.
हिंदी सिनेमाची ठेवण कशी आहे हो? तर जराशी भडक! येथे एक हिरो असतो, जो आधी सर्वसामान्य आणि नंतर सर्वशक्तिमान होतो. त्याला एकाच वेळी मारधाड करता येण्याजोगा दणकटपणा आणि झाडामागे धावत गाणे म्हणण्याचा (मूर्ख) सुद्धा सराव असायला हवा.
मराठीत ना आमचे अभिनेते ठरलेले आहे. आणि त्यांची अभिनय क्षमता सुद्धा वादातीत आहे. वर म्हटल्या गेले आहे की मराठी रंगमंच हिंदीपेक्षा पुढे आहे. तर नक्कीच असेल. त्याला कारण मराठी अभिनेते खरोखरच ग्रेट आहेत. पण हिंदी चित्रपटांचं आणि अभिनयाचं सख्यं आहे असं कोण म्हणतं? येथे मोठ्याने ओरडता आलं आणि मारधाड करता आली की झालं. वडील आणि वडील भावाच्या मागोमाग येऊन त्याच बळावर आम्ही आमच्या विझलेल्या डोळ्याच्या भरवशावर आणि वाढलेल्या केसांवर वेळ मारून नेतो. कारण किमान गुणवत्ता (ओरडण्याची)आहे.
चला हे नसेल येत तर निदान रडवणारे संवाद तरी म्हणता येत असेल तर झालं, त्यानंतर रोमांस जमायला हवा. असं कुणी आहे का हो?
आता मात्र हिंदी सिनेमाची ठेवण बदलते आहे. त्यामुळे व्यक्तीरेषेला न्याय देणारा चेहरा निवडला जातोय. आता तुमचा अभिनय लक्षात घेतल्या जाईल.
एवढं मोठं भारूड झालं त्याचं एका वाक्यात सार देतो. हिंदी किंवा उत्तर भारतीयांची जी अभिव्यक्ती आहे ती आणि मराठी मानसाची अभिव्यक्ती यात खूप अंतर आहे. मराठीत जी तरल अनुभूती असते ती हिंदीत नसणार आणि हिंदीतील वेगळे पण मराठीत नाही. म्हणून मराठी चेहरा मागे.
दक्षिणेचे अभिनेते तेथे भरपूर पैसा कमावून देताना दिसतात म्हणून त्यांच्या समोर पायघड्या.... अन्यथा नाही.
नीलकांत