चित्त,

तुमच्या आजवरच्या अनेक गझलांमधली ही गझल मला अत्युत्तम वाटली. पुढील शेर विशेष आवडले -

तुला स्मरताक्षणी इतके बरसले चांदण
चिरेबंदिस्त एकांतात घुसले चांदणे

उन्हातान्हातही ज्याला गवसले चांदणे
अशा वेड्यास सांगा काय, कसले चांदणे!

धुरामध्ये चुलीच्या गोड दिसली पौर्णिमा
भुकेल्या आसमंती मुग्ध हसले चांदणे

जसा मी पाहिला हा चंद्र कोणी पाहिला?
मला दिसले तसे कोणास दिसले चांदणे?

एक छोटीशी शंका आहे. समाधान कराल अशी आशा आहे, म्हणून विचारावे असा विचाऱ आहे.

मतल्यात घेतलेली अलामतीची सूट ही ऱ्हस्व स्वरांसाठी लागू होते का? मध्यंतरी एका चर्चेत प्रसादराव शिरगांवकरांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्याचे अंधुकसे आठवते. आदरणीय सुरेशदादांनी अलामतीची सूट दीर्घ स्वरांसाठी घेतल्याचे दाखले दिले आहेत, मात्र ऱ्हस्व स्वरांसाठी अशी सूट घेतल्याचे नमुने पहावयास मिळत नाहीत, असे काहीसे सदरहू चर्चेत चर्चिले गेले होते. चू. भू. द्या. घ्या.