अरे वा, रमझानची बरीच माहिती मिळाली.

चित्त, तुमच्या प्रश्नाचं उत्तर पेठकरांनी दिलंच आहे.  पण हे सगळं कुवेतमधे पण असतं.  चित्रपटगृह पण बंद असतात.  मी हा जो प्रसंग सांगितलाय ना...... हा रमझान नंतरच्या ईदच्या वेळचा आहे.  अजूनही बऱ्याच गमती जमती आहेत......... अशाच कळवत राहीन.

प्रसाद, लिहिन हं नक्की.

तात्या,सुखदा....... धन्यवाद. 

सुखदा, अरबी मिठाया हा एक स्वतंत्र विषय होईल. पण मला त्याबद्दल तितकी सखोल माहिती नाही.  बकलावा हा एक प्रकार असतो.  आपली खारी पफ़्स ची बिस्कीटं असतात ना त्यात बऱ्याच प्रकारचा सुका मेवा घालतात आणि त्यावर मध नाहीतर साखरेचा पाक घालतात.  फ़ार कुरकुरीत आणि खुसखुशीत असतात ह्या मिठाया.  पुढच्या वेळी भारतात जर भेट झाली तर नक्की खाऊ घालीन सगळ्यांना.

बहोत कुछ मधलं बहोत म्हणजे, कुणाचं घड्याळ पडलं, कुणाची चेन, कुणाला खरचटलं तर एकाचा नवा शर्ट फ़ाटला, कुणाचा पाय मुरगळला तर कुणाचा लिपस्टीकचा छापा पुढच्या माणसाच्या शर्टावर. अगं काही विचारु नकोस.  आणि ही धक्काबुक्की कशाला तर समोरच्या लाईनीत बसायला :)

अभिजित, पेठकर, मिलिंद, प्रियाली, चित्त, प्रसाद........ तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

प्रियाली, अगं हो गं.  बाकीच्या लोकांचा फ़ार प्रॉब्लेम होतो.  दिवसा काहीच खाता पिता येत नाही बाहेर.  शिक्षा करतात म्हणे कोणी खाता पितांना दिसलं तर.  पतीराज पण ऑफ़ीसमधे जायच्या आधीच भरपूर खाऊन जातात कारण तिकडे काहीच मिळत नाही.

 पेठकर, छानच दिलीत हं माहिती.