अलामतीची सूट दीर्घ स्वरांसाठी घेतल्याचे दाखले दिले आहेत, मात्र ऱ्हस्व स्वरांसाठी अशी सूट घेतल्याचे नमुने पहावयास मिळत नाहीत, असे काहीसे सदरहू चर्चेत चर्चिले गेले होते. चू. भू. द्या. घ्या.
अलामतीची सूट ऱ्हस्व स्वरांसाठी घेतात. दीर्घ स्वरांसाठी घेत नाहीत. गझलेच्या बाराखडीत असे स्पष्ट नमूद केले आहे. पण आपण शंका उपस्थित केलीत हे चांगले झाले. त्यामुळे वाचकांना आणि सगळ्यांनाच नव्या-नव्या गोष्टी कळू शकतात. धन्यवाद.
तसेच आमच्या एका रसिक मित्राला
धुरामध्ये चुलीच्या गोड दिसली पौर्णिमा
भुकेल्या आसमंती मुग्ध हसले चांदणे
ह्या शेरातली पौर्णिमा ही भाकरीला दिलेली उपमा आहे असे वाटते. रसिकाला जो वाटतो तो त्याचा अर्थ. पण ह्या ओळीत पौर्णिमा ही चूल फुंकणारी आई आहे.
कळावे.
चित्तरंजन