जय जय जगदंबे | श्री अंबे | रेणुके कल्पकदंबे || धृ.||
अनुपम स्वरुपाची | तुझि धाटी | अन्य नसे या सृष्टी
तुज सम रुप दुसरे | परमेष्ठी |करितां झाला कष्टी
शशिरस रसरसला | वदनपुटी |दिव्य सुलोचन दृष्टी
सुवर्ण रत्नांच्या | शिरि मुकूटी | लोपवि रविशशि कोटी
गज मुखि तुज स्तविले | हेरंबे मंगल सकला रंभे ||१||
कुंकुम शिरी शोभे |मळवटी|कस्तुरी टिळक लल्लाटी
नासिक अती सरळ | हनुवटी रुचिरामृत रस ओठी
समान जणुं लवल्या | धनुकोटी |आकर्ण लोचन भ्रुकुटी
शिरि निट भांगवळी | उफराटी कर्नाटकाची धाटी
भुजंग निळ रंगा |परि शोभे |वेणि पाठीवर लोंबे ||२||
(ही 'सुचेता' यांनी टंकलिखित केलेली आहे. मी त्यांचे आभार मानतो.)
- मोरू