सुरेख अनुभव कथन. मी शाळेत असताना तीन वर्षे माहिमला रहात होते. आजूबाजूला मुसलमान वस्ती होती. आमच्या बिल्डींगमध्ये सोळापैकी फक्त तीन हिंदू घरं होती. बाकी सगळी मुसलमान घरं. तीन वाजल्यापासूनच खाद्यपदार्थांचा घमघमाट सुटायचा. त्यातले काही पदार्थ हिंदूंच्या घरी आवर्जून पाठवले जायचे. दिवसभर सुस्तावलेला परिसर संध्याकाळी गजबजून जायचा. लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
      बिपिन आणि पेठकरांनी दिलेली माहितीही आवडली.