जगांतील भारताची स्थिति व भारतांतील महाराष्ट्राची स्थिति यांच्यांत विलक्षण साम्य आहे. घुसखोरांसाठी भारत व परप्रांतियांसाठी महाराष्ट्र म्हणजे "आओ जाओ घर तुम्हारा" असे ठिकाण आहे. त्यावर उपाय म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने (स्वत:पुरते का होईना पण) मराठी भाषेच्या वापराबाबत आग्रही राहायला हवे. ("आओ जाओ घर तुम्हारा" याचेही योग्य ते मराठी भाषांतर करावे. मला सुचलेले भाषांतर म्हणजे "कुणीही यावे नि आम्हाला लुटून जावे") दक्षिणेकडील राज्यांनी हिंदीला मज्जाव करून एक प्रकारे परप्रांतियांसाठी आपली दारेच बंद केली आहेत. त्यामुळे एरवी जो उत्तरेकडील परप्रांतियांचा लोंढा दक्षिणेकडे गेला असता त्याचाही भार महाराष्ट्रावर पडतो आहे. यावरून दैनंदिन जीवनांत जरूर नसतांना हिंदीचा वापर टाळल्यास व मराठीचा प्राधान्याने वापर केल्यास यापुढे तरी परिस्थिति आणखी बिघडणार नाही असे वाटते.