मी राज जैन, कोल्हापूर चा पण कोल्हापूर ला आल्यानंतर माझा घराण्याच्या कमीत कमी पाच पिढ्या झाल्या, सहावी पिढी मी. मग मी ही परप्रांतीय ?
आपल्याच महाराष्ट्राचे नवं- युवक / उधोजक हे बाहेरील राज्यात / देशात जाऊन आपले कार्य / उद्योग-धंदे चालू करतात व तेथून भरमसाठ नसेल पण मोठ्या प्रमाणामध्ये रुपये घेऊन ही येतात. तेंव्हा ते देखील त्या राज्याच्या लोकांसाठी परप्रांतीयच असतात.
आपले बहुतेक सर्व नेते दूरचित्रवाणीवर हिंदी भाषेतून बोलतात. - खरोखरच ह्या विषयी काहीतरी करायलाच हवे कारण महाराष्ट्रीयन असून ही ही लोक हिंदी मधून बोलतात.
मी गेली ९ वर्षे दिल्ली, केरळ, ओडिसा व हरियाना मध्ये कार्यरत आहे कधी नव्हे ती मराठमोळी मानस आजकाल महाराष्ट्राबाहेर एवढ्या मोठ्या संख्येने कार्य /काम करत आहेत , का तुम्ही लोक इतर भाषीय लोकांमध्ये मराठी लोकांना खाली बघायला लावता ... जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयासाठी अथवा मराठीच्या अतिरेकासाठी आंदोलने झाली तेंव्हा तेंव्हा इतर प्रांतीय लोक विचारतात " काय यार राज , तुम्हारे राज्य क्या चलता रहता है, तुम लोग हिंदुस्तानी नही हो क्या ? दुसरे सें क्यों जलते हो.... सिर्फ ईसलिए की ऊसे मराठी नही आती ?" काय ऊतर द्यावे ते सांगा.
हे परप्रांतीय फिरण्यासाठी नाही येत ते आपल्या पोटासाठी/ कामासाठी येतात.
मराठी येत नाही तरी महाराष्ट्रामध्ये कसे राहता ? हा प्रश्न थोडा-वेगळाच अर्थ काढतो ..... तुम्हाला नवीन देश तयार करावयाचा आहे की काय ?
सारे भारतीय माझे बांधव आहेत . असे कुंठतरी वाचलाय बुवा ! पाहा आठवून !
महाराष्ट्र हा मोठा भाऊ आहे कारण हाच असा पहिला राज्य आहे ज्या मध्ये छ. शिवाजी राजेंसारखा प्रजापती हिंदु राजा झाला..... प्रथम हिंदवी स्वराज्य !
हिंदू धर्म अतिथी साठी काय सांगतो ते सांगायलाच नको !
खूप झाले !
लहान तोंडी मोठा घास ! काही चुकले असल्यास क्षमा असावी !
आपलाच,
शनी