गावरान गंगी,

आपण दिलेली पाककृती छानच आहे.

संक्रांतिच्या आदल्या दिवशी भोगी येते त्यादिवशी आई मुडाखि, कोळाचे भरीत व लेकुरवाळी भाजी करायची त्याची आठवण झाली. हे कोळाचे भरीत गरम गरम मुडाखि बरोबर तर खूपच सुंदर लागते. मी खिचडी, कोळाचे भरीत व लेकुरवाळी भाजी असे सगळे एकत्र करून खायचे.

'लेकुरवाळी भाजी' हे नाव का पडले व त्यामध्ये काय काय घालतात हे माहीत आहे का?

रोहिणी