मा. विरभीकाकांशी सहमत. अगदीच खरे चित्र आहे हे.

बहुतांशी मराठी माणुस हा फ़क्त 'सेफ़ गेम' खेळतो असेच मला तरी वाटते.

त्याला नोकरीच हवी असते, तेही आपल्या घराजवळ आणि सरकारी असेल तर अधिक उत्तम, ८ तासाचीच...

स्वतःचे उद्येग निर्माण करायची धमक फ़ारच कमी लोकांमध्ये.

आणि बाहेर जाऊन काम करावे तर हे नाके मुरडतात. स्वतःच्या राज्यात/गावात यांना नोकरी हवी असते.

परंतु बहुतांशी परप्रांतीय असले निर्बंध स्वतःवर लादत नाहीत. कुठेही जाऊन काम करायची तयारी असते. त्यामूळेच बऱ्याचदा अधिकारी पदे यांच्या ताब्यात जाताता/असतात (दर्जा हा भाग वेगळा. तो अनेक मराठी माणसात सुद्धा असतोच. )  शिवाय अनेक व्यवसायही यांच्याच हातात असतात. (उदा. पंक्चर : दक्षिणी आण्णा, टायरची , गाडीच्या सुट्या भागांची दुकाने: सरदारजी, हार्डवेअर, किराणा: मारवाडी असेच इतर...)

आणि या सगळ्यात हातखालच्या कामाला असतो स्वाभिमानी 'मराठी' माणुस!

शिवाय अजुन एक मोलाचा गुण या परप्रांतीयांच्यात असतो आणि अगदी जाणवतो तो म्हणजे, ते आपल्या राज्यातील व्यकींना नेहमी हात देतात आणि पुढे आणायचा प्रयत्न करतात. अनोळखी दक्षिणी लोक समोर आले तर लगेच गप्पात रमतात (त्यांच्याच भाषेत) आणि एकमेकाला मदत करतात.

आपले मराठी लोक एकमेकांकडे ढुंकूनही पहात नाहीत (बऱ्याचदा!) 

आणि जर बोललेच तर आपण किती ग्रेट किंवा वेगळे हे दाखवण्यासाठी इंग्रजी किंवा हिंदीतून चालू करतात...:)

त्यामूळे परप्रांतियांविषयी रडगाणे गाण्यात किंवा आकस धरण्यात काहीच अर्थ नाही. चूक मराठी माणसांची आहे असेच वाटते.

नेते मंडळी वगैरेंनी मराठीचा आग्रह धरणे आवश्यक आहे ... हेही बरोबर...

--सचिन