लिखाळ यांच्या प्रतिसादाबद्धल आणि हें कूटकाव्य उलगडण्याचा प्रयत्न केल्याबद्धल धन्यवाद.
एक क्ल्य्यू देतो. (क्ल्यूला मराठीत काय म्हणतात ते मात्र अजून माहित नाही.)
या ओळींचा सरळ अर्थ असा आहे की, हाती धन नसल्यामुळे (चिंतेने) झोप येत नाही.
या पाठीमागे एक कथा अशी आहे की, या काव्याचा कर्ता हा एक राजकवी होता. ज्या राजाच्या (बहुदा भोज) तो होता त्या राजाने आपल्या लहरी स्वभावाने कांही काळ कवीला वेतन दिले नाही. मात्र कवीला एके दिवशी दरबारात येण्यास जरा विलंब झाला तर भर दरबारात जाब विचारला. कवीला आर्थिक विवंचनेने आधीच्या रात्री नीट झोप लागल्याने विलंब झालेला होता. हे त्याने जसेच्या तसे सांगितलें असतें तर अमर्यादेचा गुन्हा झाला असता. पण तो कवी होता ! त्याने हें असें उत्तर दिले. जें एक राजाखेरीज अन्य उपस्थित दरबारी सदस्यांना समजणे कठीण होते.
आता प्रयत्न करा. जुजबी संस्कृत आणि अर्थात संधिविग्रह तुम्हाला ज्ञात आहेच.
गानवेडा. (याचाही अर्थ पुन्हा केंव्हा तरी सांगे )